नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी मालमत्तेच्या आवारातील कडू निंबाची तोडल्याप्रकणी दोघांविरूध्द म्हसरूळ पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महानगरपालिकेने वृक्षतोडप्रकरणी कडक कारवाईचा बडगा उगारत ही कारवाई केली आहे.
पहिली कारवाई मखमलाबाद येथील जलकुंभ भागात करण्यात आली. के.बी.अमृतकार (रा.सिताई रो हाऊस.रामकृष्णनगर) यांनी सोमवारी (दि.३) आपल्या घर परिसरातील खासगी मालकीचा कडू निंबाचे झाड विनापरवानगी बुंध्यापासून तोडले तर दुस-या कारवाईत अतुल प्रेमसुख सोमानी (रा.कंसारा चौक,बोरगड) याने गेल्या ११ फेब्रुवारी रोजी आपल्या घर परिसरातील आठ वृक्ष कुठलीही परवानगी न घेता बेकायदा बुंध्यापासून तोडले. दोन्ही घटनांप्रकरणी महापालिकेचे वैभव वेताळ यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलिस नाईक बागुल व भोये करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643168197791858690?s=20