नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आनंदवली भागात घर काम करणा-या मोलकरणीने घरातील १ लाख ९५ हजार रूपये किमतीचे दागिने चोरून नेले. पुनम कृष्णा बागडे (३० रा.शाहूनगर, सिडको) असे संशयित महिलेचे नाव आहे. या चोरीप्रकरणी प्रिया सत्यनारायण खटोड (रा.दुर्गा अपा. काळेनगर, कॅनलरोड) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित महिला बागडे या खटोड यांच्या घरी मोलकरीन म्हणून काम करते. १ ऑक्टोबर २०२२ ते ११ जानेवारी २०२३ दरम्यान संशयित महिलेने खटोड कुटुंबियांचे लक्ष नसल्याची संधी साधत घरातील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ९५ हजार रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले.
संशयित महिलेने कामावर येणे बंद केल्याने चोरीचा हा प्रकार समोर आला असून अधिक तपास पोलिस नाईक मोहिते करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643168197791858690?s=20