नाशिक : प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करणा-या तरुणाविरुध्द अंबड पोलिस ठाण्यात बलात्कारासह आयटी अॅक्ट आणि बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारिरीक संबधाला विरोध करताच संशयिताने अश्लिल फोटो नातेवाईकांना पाठविल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी सिडकोतील १७ वर्षीय पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता आणि संशयित एकमेकांचे परिचीत असून गेल्या वर्षभरापासून त्यांच्या प्रेमप्रकरण सुरू आहे. याकाळात त्याने मुलीच्या घरात आणि कॅफे मध्ये घेवून जात अश्लिल फोटो काढून तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. त्यानंतर शरिरसंबधात मुलीने विरोध केला असता संशयिताने अश्लिल फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार केला. संशयिताचे ब्लॅकमेलींग वाढल्याने तसेच त्याने सदरचे फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल करून बदनामी केल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक श्रीकांत निंबाळकर करीत आहेत.