नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉलेजरोड भागात मालमत्तेच्या वादातून दांम्पत्याने महिलेस बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याघटनेतशस्त्राचा वापर करण्यात आल्याने महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष साईनकर (३८) व वंदना साईनकर (३४) अशी महिलेस मारहाण करणा-या दांम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी श्रृती दत्तात्रेय पाटील (३० मुळ रा.लातूर हल्ली समतानगर,सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता व संशयित दांम्पत्यात प्रॉपर्टीचा वाद आहे.
शनिवारी (दि.१) पीडिता कॉलेजरोड भागात गेली असता ही घटना घडली. ग्रिल हाऊस पिझा सेटर तसेच समर्थ ज्युस सेंटरच्या बाजूला संशयितांनी महिलेस गाठून प्रॉपर्टीच्या वादाची कुरापत काढून बेदम मारहाण केली. या मारहाणीत काही तरी शस्त्राचा वापर करण्यात आल्याने महिला जखमी झाली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642823753628528642?s=20