नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठक्कर बाजार आणि महामार्ग बसस्थानकात दोन महिलांचा दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेत महागड्या मोबाईलसह सोन्याचांदीचे दागिणे आणि रोकड चोराला गेले आहे. याप्रकरणी मुंबईनाका व सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात घडली. संगिता प्रशांत बैरागी (रा.विनयनगर,इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बैरागी यांची मुलगी रविवारी दुपारी बाहेरगावी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात गेली होती. बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी त्यांचा तीस हजार रूपये किमतीचा अॅपल कंपनीचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.
दुसरी घटना महामार्ग बसस्थानकात झाली. म्हसरूळ येथील कल्पना दिपक खैरनार (५० रा.रिलायन्स पेट्रोल पंपा समोर,निसर्गनगर) या रविवारी दुपारच्या सुमारास बाहेरगावी जाण्यासाठी महामार्ग बसस्थानकात गेल्या होत्या. बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांची हॅण्डबॅगची चैन उघडून बॅगीतील सोन्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे १ लाख ३९ हजार ७५० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार आडके करीत आहेत.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
⛔मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय; *शालेय अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला*
https://t.co/KROiXlSVvl#indiadarpanlive #cm #yogi #adityanath #school #up #syllabus #mughal #history #removed #education— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 3, 2023