नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परप्रांतीय नोकरदार महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. एकाच ठिकाणी नोकरी करीत असतांना झालेल्या ओळखीचा फायदा उचलून संशयिताने हे कृत्य केले आहे. ऑनलाईन पाठलाग वाढल्याने त्रस्त झालेल्या महिलेने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.
अमित अवदेश पांडे (२९) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी शहरातील नवीन पंडित कॉलनी भागात राहणा-या पीडितेने तक्रार दाखल केली आहे. परप्रांतीय पीडिता लातूर येथे नोकरीस होती. त्यावेळी तिच्या प्रांतातील संशयिताशी ओळख झाली होती. दोघे एकाच ठिकाणी काम करीत असल्याने त्यांच्यात चांगले संबध होते.
मात्र त्यानंतर महिला नाशिक शहरात स्थायिक झाली. गेल्या तीन महिन्यांपासून संशयित या ना त्या कारणाने ई मेलद्वारे ऑनलाईन संपर्क करीत होता. प्रारंभी महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले मात्र त्याचा अतिरेक वाढल्याने व त्याने अश्लिल संभाषण सुरू केल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विष्णू भोये करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642798239329193985?s=20