नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७८ हजाराचा ऐवज लंपास केला. रिना संजय बिन्हाडे (४० रा.लिलावती बंगला,दिगंबर सोसा.अमृतधाम) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिन्हाडे कुटुंबिय शनिवारी (दि.१) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे लॉक तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे ७८ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642823753628528642?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642823718178283520?s=20