भरधाव दुचाकी घसरल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चेहडी पंपीग भागात भरधाव दुचाकी घसरल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. अनिल देविदास चव्हाण (रा.अरिंगळे मळा,सिन्नर फाटा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चव्हाण पळसे गावाकडून चेहडी पंपीगच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. चेहडी पंपीग परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. शुक्रवारी (दि.३१) कुटूंबियांनी त्यास धाडीवाल रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ.निलेश सुर्यवंशी यांनी उपचार सुरू असतांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
तडिपारास पोलिसांनी गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील स्वामीनगर भागात गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. वैभव रणजीत लोखंडे (२०, रा. रिगल अष्टविनायक अपा.स्वामीनगर अंबड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोखंडे याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास पोलिसांनी शहर व जिह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच बुधवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी धाव घेतली असता संशयित पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी गुन्हे शाखेचे हवालदार संजय सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.