नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर औद्योगीक वसाहतीत १९ मार्च रोजी पुर्ववैमन्यसातून एकावर गोळीबार करून धारदार शस्त्रांने हल्ला करणा-या सहा जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. भुषण किसन पवार (२६), रोहित मंगलदास अहिरराव (२७), गणेश राजेंद्र जाधव (२६), किरण दत्तात्रय चव्हाण (२४, चौघे रा. शिवाजीनगर, सातपूर), आशिष राजेंद्र जाधव (२८, रा. शिवाजी चौक) व सोमनाथ झांजर उर्फ सनी (२२, रा. सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष जाधव व फियार्दी राहुल पवार हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यात एकमेकांच्या भावांच्या खूनावरून पुर्ववैमन्यस्य आहे. याचा बदला घेण्यासाठी संशयित आशिष जाधव व इतरांनी कट रचून राहुल पवार व तपन जाधव यांचा कारमधून पाठलाग केला होता.
त्यात संशयितांनी आपली कार तपन जाधवच्या कारवर आदळवून हवेत गोळीबार केला तसेच तपनवर शस्त्रांनी वार केले. त्यानंतर संशयित एका नागरिकाची दुचाकी घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात राहुल पवारच्या फियार्दीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपास केला असता या गुन्ह्यात आशिष जाधवला इतरांनी मदत केल्याचे समजले. त्यात तपन व राहुल यांचा माग संशयितांनी काढला व त्याची माहिती आशिषला दिली. त्यानुसार त्यांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा करून संशयित फरार झाले. मात्र गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तपास करून संशयितांना पूणे,मालेगाव,भिवंडी,शिर्डी,लातूर,जव्हार अश्या वेगवेगळ््या ठिकाणाहून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे,उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, अंमलदार रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझिमखान पठाण, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, महेश साळुंके आदींच्या पथकाने केली.