नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वासन हाऊस भागात इमारतीवरून पडल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. बिल्डींग कामासाठी बांधलेले बांबूची पहाड खोलत असतांना ही घटना घडली. याप्रकरणी इमारत मालकासह दोघा बांधकाम ठेकेदारांविरूध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या मजल्यावरून तो पहाड सोडत असतांना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. इमारत मालकासह दोघा ठेकेदारांनी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न करता काम करण्यास भाग पाडल्याने ही घटना घडल्याचा आरोप मृत तरूणाचे वडिल घुगे यांनी केला असून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.विश्वनाथ पाटील (इमारत मालक), मुर्तूजा ट्रंकवाला व शांताप्पा आनंतप्पा रागम (दोघे ठेकेदार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानदेव शिवराम घुगे (५२ रा.केळी आडगाव जि.हिंगोली) यांनी तक्रार दाखल केली आहे. वासन हाऊस परिसरातील बजाज शोरूमजवळ डॉ.विश्वनाथ पाटील यांची इमारत आहे. या बिल्डींगचे दोघा ठेकेदारांच्या माध्यामातून नुतनीकरणाचे काम सुरू असून, बुधवारी (दि.२९) सायंकाळी तक्रारदार यांचा मुलगा रामदास ज्ञानेश्वर घुगे (२७) हा कामगार बहुमजली बिल्डींगच्या कामासाठी बांधलेले बांबूचे पहात खोलत असतांना ही घटना घडली होती. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20