नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कंपनीतील गुंतवणुकीतून दामदुप्पटच्या आमिषाने ५२ लाखाची फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणूक प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष इद्रभान गोरे (३५ रा.लक्झरीया अपा.अशोका मार्ग ) यांनी तक्रार दाखल केली आहे.
अविनाश सुर्यवंशी, वैभव ननावरे, साईनाथ त्रिपाठी, अमोल शेजवळ, शाहरूख देशमुख, जयेश वाणी, सिध्दार्थ मोकळ, आशुतोष सुर्यवंशी, इशा जयस्वाल, सचिन जयस्वाल व हितेश पवार अशी फसवणूक करणा-या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी कॉलेजरोडवरील यशोमंदिर अव्हेन्यू येथे आपले शेअर मार्केट ट्रेडींगचे कार्यालय थाटले होते. या ठिकाणी तक्रारदार गोरे यांचे जाणे येणे होते. संशयित ठकबाजांनी शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी येणा-या गुंतवणुकदारांना आपल्या कंपनीत गुंतवणुक केल्यास आकर्षक परताव्याचे आमिष दाखविल्याने ही फसवणुक झाली.
संशयितांच्या आमिषाला बळी पडत तक्रारदार यांनी १५ फेब्रुवारी ते २२ डिसेंबर २०२२ दरम्यान तब्बल ५२ लाख दहा हजार रूपयांची गुंतवणुक केली. मात्र गुंतवणुकीची मुदत संपूनही संशयितांनी रक्कम अथवा दामदुप्पटची रक्कम परत केली नाही. याच दरम्यान संशयितांनी कार्यालय बंद करून पोबारा केल्याने तक्रारदार गोरे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023