नाशिक : वडाळानाका भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह मोबाईल चोरून लंपास केला. अज्ञात चोरट्यांनी अर्धवट उघड्या दरवाजातून पहिल्या मजल्यावरील रूममध्ये प्रवेश करून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील साडे दहा हजाराची रोकड आणि मोबाईल असा सुमारे २२ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदा अशोक कदम (रा. घरनं.११९ नागसेननगर,वडाळानाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कदम कुटूंबिय बुधवारी घरात असतांना ही घरफोडी झाली. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.