नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रावळगाव येथील अनुदानित प्राथमिक शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविणा-या शिक्षीकेवर भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या कागदपत्र पडताळणीत ही बाब समोर आली आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजल ठाकरे असे संबधीत शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी जि.प. शिक्षण अधिकारी कार्यालयातील भगवान फुलारी यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित महिला शिक्षिकेने मालेगाव स्थित एका एज्युकेशन ट्रस्ट संचलित रावळगाव येथील अनुदानित प्राथमिक शाळेत नोकरी मिळवली. २०१७ मध्ये शिक्षक सेवक या पदी नोकरी मिळवितांनी सदर महिलेने अन्य कागदपत्रांसह सक्तीच्या टीईटी परिक्षा उतीर्ण असल्याचे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद (पुणे) प्रमाणपत्र सादर केले.
गेल्या काही वर्षापासून सदर महिला या संस्थेत सेवा बजावत असतांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागाने केलेल्या पडताळणीत हा बनाव समोर आला आहे. सदर शिक्षीकेने नोकरी मिळवितांना सादर केलेली प्रमाणपत्रच बनावट असल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक जितेंद्र माळी करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20