नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाटावर राजस्थान येथील महिलेची पर्स उघडून ५० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. मंदिरात देवदर्शनासाठी रांगेत उभ्या असतांना चोरट्यांनी हे पैसे चोरले. या चोरी प्रकरणी सुनिता सत्यवीर डुडी (३९ रा.रसोडा भिमसर,गंगापूर जि.माधवपूर राजस्थान) या महिलेने तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डुडी या आपल्या कुटुंबियांसह पर्यटनानिमित्त शहरात आल्या होत्या. गुरूवारी (दि.३०) त्या गोदाघाटावरील कपालेश्वर मंदिरात देवदर्शन करण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. दुपारच्या सुमारास कुटुंबियासह त्या मंदिरातील दर्शन रांगेत उभ्या असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांची पर्स उघडून ५० हजाराची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार वाघमारे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1641750161780260864?s=20