नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंद बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे पावणे पाच लाखाच्या ऐवज लंपास केला आहे. कॉलेजरोडवरील कृषीनगर भागात झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी चांदीच्या वस्तू, आयफोन, आयपॅड, दुर्बीण व सोनी कंपनीच्या कॅमेरा चोरुन नेला.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्रकुमार सत्यपाल भाटीया (रा .बंगला नं. ११ दत्त मंदिरासमोर, कृषीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भाटीया कुटुंबिय २४ ते २८ मार्च दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचे लॅचलॉक तोडून कपाटातील चांदीच्या वस्तू, आयफोन मोबाईल, आयपॅड, दुर्बीण व सोनी कंपनीचा कॅमेरा असा सुमारे ४ लाख ७६ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक येसेकर करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1641290707758632960?s=20