नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजीवनगर भागात कोयत्याच्या धाक दाखवित दहशत माजविणा-या तरूणास पोलिसांनी गजाआड करुन त्याच्या ताब्यातून धारदार कोयता हस्तगत केला आहे. राहूल संजय थोरात (२५ रा.जानव्ही अपा.कृष्ण मंदिराशेजारी चेतनानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावरील वाळूचा ठिय्या असलेल्या रेश्मा वाईन दुकान परिसरात बुधवारी (दि.२९) सायंकाळी कोयत्याचा धाक दाखवत एक तरूण दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाव घेत संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात धारदार कोयता मिळून आला.
धारदार शस्त्र जप्त करीत पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलिस शिपाई सौरभ माळी यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक गौतम करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1641290707758632960?s=20