नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोड भागात सासू व मेव्हणीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दोघांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांमध्ये तक्रारदार महिलेचा मुलगा व जावई आहे. जखमी महिलांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मनिष एकनाथ लोखंडे (४९ रा.शंकर जेऊघाले चाळ,हनुमानवाडी) व मनोहर सोमनाथ मोंढे (रा.मैत्री पुष्प अपा.भावबंद मंगल कार्यालयाजवळ हनुमानवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अरुणा एकनाथ लोखंडे (रा. अश्वमेध नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. अरूणा लोखंडे यांचा घरगती मेसचा व्यवसाय आहे. लोखंडे व त्यांची मानलेली मुलगी आरती नारायण वानखेडे (रा.राजवाडा,गंगापूरगाव) या सोमवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास पेठरोडवरील गुरूकृपा हॉस्पिटल शेजारील शिवपॅलेस सोसायटीतील आपल्या घरात आवर सावर करीत असतांना जावई लोखंडे व मुलगा मोंढे या दोघांनी तेथे येवून हा हल्ला केला होता.
मानलेली मुलगी आरती वानखेडे हीस येथे येवू देवू नकोस ती तुझे कान भरते असे म्हणत संशयितांनी शिवीगाळ करीत दोघा महिलांवर हल्ला चढविला होता. या घटनेत लोखंडे यांना धक्काबुक्की करीत संशयितांनी आरती वानखेडे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला होता. त्यात त्या जखमी झाल्या असून दोघींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20