चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करत कोयत्याने केला हल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काठेगल्ली परिसरात चार जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत २४ वर्षीय तरूण जखमी झाला असून,या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश गोंधळी,क्रिश शिंदे सचिन वाघमारे व श्रीकांत उर्फ लड्डू रणखांबे अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी आशुतोष भोसले (रा. इंदिरा पॅलेस,नागरे चौक सातपूर) या जखमी तरूणाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भोसले मंगळवारी (दि.२८) काठेगल्ली भागात गेला होता. स्वामी समर्थ मंदिरासमोरील मोकळया मैदाणात गाठून संशयितानी त्यास मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ गेली.
यावेळी संतप्त टोळक्याने त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तर त्यातील एकाने त्याच्यावर धारदार कोयत्याने वार केल्याने भोसले गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनवणे करीत आहेत.
भरदिवसा घरफोडी; चोरट्यांनी ४७ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४७ हजार रूपयाचे ऐवज लंपास केले. श्रीरामनगर भागात झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी राहूल सुनिल गांगुर्डे (३० रा.अनर्व पार्क,निअर शायनिंग स्टार हायस्कूल जवळ) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांगुर्डे कुटुंबिय मंगळवारी (दि.२८) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून बेडरूममधील कपाट ठेवलेले सुमारे ४६ हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.