आत्महत्येचे सत्र सुरूच; वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी नुकतीच आत्महत्या केली. त्यातील १९ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत तर एकाने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिली घटना दिंडोरीरोडवरील गंजपथ भागात घडली. गुरूजीत सिंग रंधवा (३७ रा.विश्वसंघ सोसा.गजपंथ म्हसरूळ) यांनी गेल्या ८ मार्च रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.
दुसरी घटना हिंगणवेढे येथे घडली. येथील अक्षय राजू पवार (१९) या युवकाने रविवारी (दि.२६) कुटूंबिय विवाह सोहळयानिमित्त बाहेरगावी गेलेले असतांना आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिस पाटील संभाजी शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक ठेपणे करीत आहेत.
⛔ BCCIने यंदासाठी या खेळाडूंशी केला करार… यांना ठेवले बाहेर…
*बघा, कोणत्या खेळाडूला किती मिळणार पैसे?* https://t.co/lCPUOhWwdI#indiadarpanlive #bcci #indian #cricket #team #player #2023 #contracts— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 27, 2023