नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विहीतगाव शिवारात भरधाव दुचाकी घसरल्याने २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. राहूल नरसिंग जाधव (रा.मधुबन सोसा.बनकर चौक,काठेगल्ली) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जाधव गेल्या शुक्रवारी (दि.२४) देवळाली कॅम्प भागात गेला होता. रात्रीच्या वेळी तो आपल्या घरी दुचाकीने परतत असतांना हा अपघात झाला. विहीतगाव टी पॉईंट भागात भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. मित्र किरण वाघ यांनी त्यास तात्काळ सोपान हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना रविवारी डॉ.संजय व-हाडे यांनी त्यास मृत घोषीत केले.
अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.