भरदिवसा घरफोडी; चोरट्यांनी ३७ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३७ हजाराच्या ऐवज लंपास केले. जयभवानी रोडवरील आवटेनगर भागात झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी नऊ हजार रूपयांची रोकड व सोन्याचांदीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालिनी कृष्णा शंकोळे (रा.मीरा पार्क,नंदनवण कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शंकोळे कुटुंबिय रविवारी (दि.२६) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३७ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.
भरदिवसा कोयता घेवून फिरणा-यास पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा कोयता घेवून फिरणा-या एकास पोलिसांनी सिडकोत गजाआड केले आहे. प्रतिक विलास गिरमे (रा.सप्तशृंगी चौक, लेखानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गिरमे याच्या ताब्यातून धारदार कोयता पोलसिांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तमनगर येथील शिवपुरी चौक भागात एक तरूणाकडे कोयता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२६) पोलिसांनी धाव घेत संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात धारदार कोयता मिळून आला. याप्रकरणी अंमलदार शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक अतुल बनतोडे करीत आहेत.