नाशिक : मंगळवारी पंचवटीतील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. एका घटनेत महिलेने विषारी औषध सेवन केले तर दुस-या घटनेत ४० वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी म्हसरूळ आणि पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिंडोरीरोडवरील अश्विनी रूपेश जगळे (३६ रा.प्रभातनगर) या महिलेने मंगळवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून सेल्फस नावाचे विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी तिला तात्काळ नजीकच्या सिनर्जी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना तिस वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार रोकडे करीत आहेत. दुसरी घटना फुलेनगर येथे घडली. फुलेनगर येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तू रामचंद्र बोडके (४० रा. वाघमारे बाबा चाळ,म्हसोबा गल्ली) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. बोडके यांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या पत्र्यांच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला नववारी साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ठकूबाई बोडके यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक के. टी. काळे करीत आहेत.