नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सांगली जिह्यातील तरूणाविरूध्द अभियांत्रीकीच्या विद्यार्थीनीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पांडूरंग लोळगे (रा.सांगोला ता.तासगाव जि.सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरूणीने आपले जीवन संपविल्याची तक्रार कुटुंबियांनी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
निफाड तालूक्यातील कल्याणी फाफाळे (२० रा.म्हाडा कॉलनी,न्यू इग्लिश स्कूल शेजारी,आडगाव) ही युवती शहरातील एका नामांकित संस्थेत अभियांत्रीकेचे शिक्षण घेत होती. अन्य मैत्रीणींसमवेत ती म्हाडा कॉलनीत वास्तव्यास होती.
गेल्या गुरूवारी (दि.२) मैत्रीणी कॉलेजला गेल्या असता तिने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या ठिकाणी बेडरूममध्ये छताच्या हुकाला साडी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. कुटुंबियास मिळालेल्या माहितीनुसार तिला संशयिताने फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने युवतीने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वडिल राजाराम फापाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक अशोक पाथरे करीत आहेत.