रामकुंडा जवळ धार्मिक विधीसाठी दिल्ली येथून आलेल्या महिलेच्या बॅगेतील अलंकार चोरट्यांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाटावरील रामकुंडा जवळ धार्मिक विधीसाठी दिल्ली येथून आलेल्या महिलेच्या बॅगेतील अलंकार चोरट्यांनी लंपास केले. चोरी गेलेल्या बँगेत सुमारे ७४ हजार रूपये किमतीच्या दागिने होते.या चोरीप्रकरणी अंजली अरविंद चौधरी (रा.संगमविहार,नवी दिल्ली) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरी शुक्रवारी कुटुंबियासमवेत धार्मिक विधीसाठी शहरात आल्या होत्या. सकाळच्या सुमारास त्या रामकुंडावर विधीवत पुजा करीत असतांना भामट्यांनी गर्दीची संधी साधत त्यांच्या जवळील बॅगेची चैन उघडून सुमारे ७४ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.
बंद गॅरेजममधून चोरट्यांनी चारचाकी वाहनांचे ७१ हजार रूपये किमतीचे स्पेअरपार्ट चोरले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील पवार लॉन्स जवळ बंद गॅरेजमध्ये शिरून चोरट्यांनी चारचाकी वाहनांचे ७१ हजार रूपये किमतीचे स्पेअरपार्ट चोरून नेले. या चोरीप्रकरणी माणिक प्रभाकर ढगे (३७ रा.राशेगाव ता.दिंडोरी) यांनी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढगे यांचे पवार लॉन्स भागात चारचाकी वाहन दुरूस्तीचे श्री सप्तशृंगी नावाचे गॅरेज आहे. गुरूवारी (दि.२३) रात्री ढगे आपले गॅरेज बंद करून घरी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद गॅरेजचे कुलूप तोडून वेगवेगळया चारचाकी वाहनांचे स्पेअरपार्ट चोरून नेले. अधिक तपास हवालदार अरगडे करीत आहेत.