भरदिवसा घरफोडून चोरट्यांनी ३६ हजाराच्या ऐवज केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा घरफोडून चोरट्यांनी सुमारे ३६ हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना चाडेगाव – कोटमगाव येथे घडली. या घरफोडीत चोरट्यांनी रोकड व सोन्याचांदीच्या दागिण्यांसह लॅपटॉप चोरुन नेले. या घरफोडी प्रकरणी विठाबाई दशरथ मानकर (६० रा. चाडेगाव हल्ली जुना सायखेडारोड, पंचक) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानकर कुटुंबिय गेल्या सोमवारी (दि.२०) पंचक येथील आपल्या घरी आले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चाडेगाव येथील घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली रोकड,सोन्याचांदीचे दागिणे व लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
…….
जुगार खेळणा-या तीन जणावर पोलिसांची कारवाई, रोकड व जुगाराचे साहित्य केले जप्त
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुलाबवाडी येथील मालधक्का गेट जवळ उघड्यावर जुगार खेळणा-या तीन जुगारींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे १२ हजार ४०० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण काशिनाथ मोरे (रा.सिध्दार्थ नगर एकलहरा),प्रविण बाबुलाल बेग (रा.फर्नांडीसवाडी,जयभवानीरोड) व संतोष दिवाकर गांगुर्डे (रा.पंचक जेलरोड) अशी संशयित जुगारींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई विशाल कुवर यांनी फिर्याद दिली आहे. मालधक्का गेटवरील चहाचे टपरी परिसरात काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.२३) पोलिसांनी धाव घेत छापा टाकला असता संशयित मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातील १२ हजार ४०० रूपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.