नाशिक : गंगापूर गावात आर्थिक देवाण घेवाणीतून कुटुंबियांनी जातीवाचक शिवीगाळ करीत तरूणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरूध्द विनयभंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर किसन शिंदे,हर्षद किसन शिंदे, ओंकार शंकर शिंदे, अशोक किसन शिंदे, अमोल अशोक शिंदे व प्रशांत अशोक शिंदे (रा.सर्व गंगापूरगाव) अशी संशयितांची नावे आहेत. पीडितेचे शंकर शिंदे यांच्याशी आर्थिक व्यवहार आहेत. ४ जून रोजी पीडिता व तिची आई उर्वरीत पैसे घेण्यासाठी शिंदे कुटुंबियांच्या घरी गेल्या असता ही घटना घडली. शिंदे कुटुंबियाच्या घराच्या ओट्यावरून मायलेकींनी पैशाची मागणी केली असता संशयितांनी पैशांची परतफेड न करता दोघींना जाती वाचक शिवीगाळ केली. यावेळी संतप्त अशोक शिंदे यांनी पीडितेचा विनयभंग केला. चौकशी अंती हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना खरीत आहेत.