नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयडीबीआय बँकेच्या द्वारका शाखेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असतांना वृध्द महिलेची पर्स उघडून चोरट्यांनी एक लाख लंपास केले. या चोरीची पोलिस सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौशल्या धर्मराज पाटील (७२ रा.हॅपिहोम कॉलनी, द्वारका ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील मंगळवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास पैसे भरण्यासाठी आयडीबीआय बँकेच्या द्वारका शाखेत गेल्या होत्या. पैसे भरण्यासाठी त्या कॅशिअर समोरील रांगेत उभ्या असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खाद्यावरील पर्सची चैन उघडून एक लाखाची रोकड हातोहात लांबविली. पैसे भरण्यासाठी त्यांनी बॅगेची पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली.
याबाबत माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बँकेतील सीसीटिव्ही यंत्रणेचे फुटेज ताब्यात घेतले असून त्याद्वारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलिस नाईक आर.बी.कोळी करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1638459601963327490?s=20