नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करणा-याला पोलिसांनी गजाआड केले आहे. नाशिकरोड परिसरातील श्रमिकनगर झोपडपट्टीत हा कोयताधारी धाक दाखवत होता. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून कोयता हस्तगत केला आहे. रोहित अशोक सिंग (२१ रा.श्रमिकनगर झोपडपट्टी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रमिकनगर झोपडपट्टीत हातात कोयता घेवून फिरणारा तरूण नागरीकांना शिवीगाळ करीत दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास पोलिसांनी धाव घेत संशयितास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात धारदार कोयता मिळून आला.
त्याच्या ताब्यातून शस्त्र हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस शिपाई केतन कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक गोसावी करीत आहेत.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/rGXi3aKJ1Q— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 22, 2023