नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणा-या चार जणांविरूध्द मुंबई नाका पोलिस स्थानकात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणा-यांकडे पैश्यांची मागणी केल्याने संशयितांनी एकाच्या माध्यमातून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला. याप्रकरणी फिरोज बशिर सय्यद (रा.झिनतनगर, राणाप्रताप चौक सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नविद सादिकमिया जहागिरदार,सर्फराज इकबाल काझी,मोहम्मद जब्बार शेख व रफिक जब्बार शेख अशी आर्थिक फसवणुक करून धमकी देणा-या संशयितांची नावे आहेत.
सय्यद यांना गेल्या वर्षी हज यात्रेस जायचे होते. त्यामुळे तिघा संशयितांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी संशयिताकडे यात्रेसाठीची रक्कम सुपूर्द करण्यात आली होती. हा प्रकार ४ जुलै ते ३० ऑगष्ट दरम्यान घडला होता. कालांतराने यात्रा रद्द झाल्याच्या नावाखाली संशयितांनी सय्यद यांना संपूर्ण रक्कम परत न करता बँक खात्यात पैसे नसतांना एक लाख १० हजाराच्या रकमेचा धनादेश दिला होता.
या रकमेसाठी सय्यद यांनी तगादा लावला असता संशयितांनी रफिक शेख याच्या माध्यमातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच सय्यद यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1638459601963327490?s=20