नाशिक : मखमलाबाद रोडवर जुन्या वादाची कुरापत काढून एकास त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत तरूण जखमी झाला आहे. या मारहाणप्रकरणी सिध्दांत विनोद परदेशी (२१ रा. विठ्ठल रूख्मिनी मंगल कार्यालयाजवळ,म.बादरोड) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश गिते ,संदिप गाडे (रा. दोघे मोरे मळा) व दादू दोबाडे (रा.गोरक्षनगर,दिंडोरीरोड) अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. परदेशी रविवारी सायंकाळी मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल सिग्नल परिसरात आपल्या मित्रांची वाट बघत उभा असतांना ही घटना घडली. वाटेने जाणा-या त्रिकुटाने त्यास गाठून मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. यावेळी संशयित गिते याने तुझे फार झाले. आज तुला दाखवतो मी काय आहे असे म्हणत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी उर्वरीत संशयितांपैकी एकाने परदेशी याच्या डोक्यात वजनी वस्तू मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास पोलिस नाईक पी.पी.झनकर करीत आहेत.