नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा वाहतूकीसाठी भरलेला सव्वा तीन लाखाचा मदयसाठा इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या ओमनी कारमधून पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी कार मालक पदमसिंग कैलास बजाड (३२ मुळ रा.जळकु झोडगे ता.मालेगाव हल्ली पाटील हॉस्पिटल मागे,सिंहस्थनगर,सिडको) या गजाआड केले असून गंगापूर पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक हेमंत नागरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आनंदवली भागातील प्रियंका ब्लोसम सिरीन मिडोज या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या ओमनीकार एमएच १५ बीएक्स ००८१ मध्ये बेकायदा मद्यसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.१९) रात्री पथकाने छापा टाकून पाहणी केली असता कारमध्ये बेकायदा विक्री आणि वाहतूकीसाठी मोठ्याप्रमाणात दारू साठा आढळून आला.
संशयित मालकास ताब्यात घेत पोलिसांनी कारसह मद्यसाठा असा सुमारे ३ लाख १७ हजार १०५ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई एपीआय नागरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नाईक दिघे,डंबाळे,भालेराव अंमलदार येवले,नांद्रे,कुटे,फुलपगारे,सानप आदींच्या पथकाने केली.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1637743863753478144?s=20