नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून एकाने चार वर्ष तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने लग्नाचा तगादा लावल्याने संशयिताने जातीवाचक शिवीगाळ करून तिला लग्नास नकार दिल्याने पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार केली. बिलाल अन्वर शेख (रा.शिंदेगाव ना.रोड) असे संशयिताचे नाव आहे. संशयित व पीडिता एकाच परिसरातील रहिवासी असून त्यांच्यात २०१९ पासून प्रेमसंबध आहेत. पीडिता अनुसूचित जाती जमातीची असल्याची माहिती असतांनाही संशयिताने तिला लग्नाचे आमिष तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. मुलीच्या घरी व सिन्नर येथील सुर्या आणि संस्कृती हॉटेल मध्ये घेवून जात त्याने बळजबरीने हे कृत्य केले. चार वर्ष उलटूनही संशयिताकडून लग्नासाठी पुढाकार घेतला जात नसल्याने पीडितेने त्याच्याकडे तगादा लावला असता ही घटना घडली. संतप्त संशयिताने युवतीस जातीवाचक शिवीगाळ करीत लग्नास नकार दिल्याने व त्याने दुस-या मुलीसोबत लग्न करण्याची तयारी केल्याने हा प्रकार पोलिसात गेला आहे.