नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील नामांकित डॉक्टरला केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी चार लाखाला गंडा घातला. याप्रकरणी डॉ.सृष्टी विजन (रा.कॉलेजरोड) यांनी तक्रार दाखल केली असून सायबर पोलिस ठाण्यात फसवणुक, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या बनावट वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडून कुठलाही ओटीपी न देता ही फसवणूक करण्यात आली आहे.
विजन यांचे सासरे डॉ.विनोद विजन हे गेल्या बुधवारी (दि.१)कॉलेजरोड येथील आपल्या घरी असतांना भामट्यांनी त्यांच्याशी ८५८०२०२६९१,८५८०२७४७७५ व ८९८७९४७८५५ या क्रमांकावरून संपर्क साधला होता. एचडीएफसी बँकेच्या खात्याची केवायसी अपडेट करण्याचा बहाणा करीत संशयितांना बँकेच्या बनावट असलेल्या वेबसाईटवरून डॉ.विजन यांना वेळोवेळी संदेश पाठवून मॅसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिल करण्यास भाग त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यात परस्पर चार ऑनलाईन व्यवहार करण्यात आले. कुठलाही ओटीपी न देता तब्बल ३ लाख ९९ हजार ९८४ रूपयांची रक्कम अन्य खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक बिजली करीत आहेत.