लग्नास नकार दिल्याने तरुणाने मैत्रिणीस बेदम मारहाण; गुन्हा दाखल
नाशिक : हिरेनगर भागात लग्नास नकार दिल्याने तरुणाने मैत्रिणीस बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मैत्रीणीला हा तरुण कारमध्ये घेऊन गेला होता. पण, तरुणीने लग्नास नकार देता त्याने अगोदर कारमध्ये मारहाण केली. नंतर तिला अर्ध्यावाटेत सोडून दिले. यावेळी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणीने पोलिस स्थानकात धाव घेतली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनू नामक तरूण तिचा मित्र असून दोघेही एकाच भागात राहतात. गेल्या काही दिवसांपासून तो तिचा चारचाकीतून पाठलाग करीत होता. गेल्या रविवारी त्याने पीडितेस गोडबोलून आपल्या कारमध्ये बसविले. यानंतर त्याने अशोकामार्ग, हिरेनगर, व्दारका,पंचवटी व नाशिकरोड भागातून पीडितेस फिरविले. यावेळी त्याने तरूणीकडे लग्नाची मागणी केली. मात्र तरूणीने त्यास स्पष्टपणे नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त संशयित कारचालकाने तिला शिवीगाळ करीत कारमध्येच बेदम मारहाण केली. या घटनेत जीवे मारण्याची धमकी देत त्याने डोळयास दुखापत केली. तसेच अर्ध्यावाटेतच आपल्या वाहनातून पीडितेस उतरवून दिल्याने युवतीने पोलिस ठाणे गाठले असून अधिक तपास उपनिरीक्षक बाळू गिते करीत आहेत.
बँकेत चोरीचा प्रयत्न
नाशिक : शालिमार भागात जनलक्ष्मी बँकेच्या शाखेत बँक चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण, चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार बँक बंद असतांना चोरट्यांनी चोरीचा प्लॅन आखला. त्यांनी बँकेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीतून प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी कर्मचारी नेहमी प्रमाणे कामावर आले असता ही घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी कपाटातील आणि टेबलावरील कागदपत्रांची उस्तारपास्तर आणि काही कागदपत्र आणि फाईल खाली पडलेले दिसून आले. तसेच लाकडी कपाटाचे दरवाजे व टेबलचे ड्रावर उघड्या अवस्थेत होते. चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. याप्रकरणी कैलास सदाशिव कोठुळे (रा.दत्तनगर,पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. कोठुळे शालिमार भागातील संदर्भ हॉस्पिटल समोरील कावस आर्केड येथील दि.जनलक्ष्मी सहकारी बँक लि. (शेड्यूल बँक) या बँकेचे कामकाज पाहतात. शनिवारी (दि.१६) नेहमीप्रमाणे कर्मचारी बँकेचे कामकाज आटोपून गेले होते. त्यानंतर हा चोरीचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.