नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वृध्दाच्या मोबाईल हिसकावून पोबारा करणारा चोराला पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज बघून गजाआड केले आहे. इम्रान हनिफ पठाण (२८ रा.कथडा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी भागचंद्र गणेश लध्दड (६७ रा.लिंगायत कॉलनी,देवळाली कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लध्दड गेल्या शुक्रवारी (दि.३) जुने नाशिक भागात कामानिमित्त आले होते. सायंकाळच्या सुमारास ते चौकमंडई परिसरातून पायी जात असतांना ही घटना घडली होती. गर्दीतून आलेल्या भामट्याने त्यांच्या शर्टच्या खिशातील सुमारे सहा हजार रूपये किमतीचा मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.