नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या अकरा जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे ३१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. म्हसरूळ शिवारातील देशमुख मळयात खुलेआम हे सर्व जण जुगार खेळत होते. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने म्हसरूळ शिवारात केली. लक्ष्मण उर्फ लखन डोलनार (रा.वज्रेश्वरीनगर,दिंडोरीरोड), प्रकाश कापसे (रा.पवार मळा कर्ननगर,आरटीओ समोर), गोकुळ धोबी (रा.भगवती चौक,उत्तमनगर सिडको), राजू देशपांडे (रा.देवगन सोसा.मधूबन कॉलनी), धनराज पाटील (रा.वाढणे कॉलनी,म्हसरूळ), टोपाजी आव्हाड (रा.त्रिमुर्तीचौक,सिडको), शाम नवघरे (रा.दत्तचौक,सिडको), बाळू पालवे (रा.म्हाडा,भारतनगर), पांडूरंग शेवाळे (रा.मोरेमळा हनुमानवाडी), हितेश ननावरे (रा.वाल्मिकनगर,पंचवटी) व दिपक देशमुख (रा.देशमुख मळा,म्हसरूळ शिवार) अशी संशयित जुगारींची नावे आहेत.
देशमुख मळयातील जीजाऊ नर्सरी भागात उघड्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास युनिट १ च्या पथकाने छापा टाकला असता संशयित पत्यांच्या कॅटवर पैसे लावून अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ३० हजार ९८० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आला असून पोलिस नाईक विशाल देवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक वसावे करीत आहेत.