नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मानसिक व शारिरीक छळ करूनही पीडिता माहेरून पैसे व दागिणे आणत नसल्याने सासू सास-यांनी तिच्या अंगावरील श्रीधन बळजबरीने काढून घेतले तर पतीने पार्न साईटवरील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडीत पत्नीने याप्रकाराची पोलिस स्थानकात तक्रार दिली असून अंबड पोलिस ठाण्यात ठाणे स्थित पतीसह त्याच्या आई वडिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजीत दिक्षीत, सुदाम दिक्षीत व पुष्पलता दिक्षीत (रा.कोकणीपाडा,ठाणे) अशी संशयितांची नावे आहेत. सिडकोत भागात राहणा-या पीडीतेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २००९ मध्ये संशयित अभिजीत दिक्षीत याच्याशी पीडितेचा विवाह झाला. यावेळी माहेरच्या मंडळीने मुलीस श्रीधन म्हणून समारे ३० तोळे सोने दिले होते. नव्याचे नऊ दिवस संपताच सासरच्या मंडळीकडून विवाहीतेचा माहेरून ४५ लाख रूपये आणि ५० तोळे सोने आणावे या मागणीसाठी छळ सुरू झाला. मानसिक व शारिरीक छळ करूनही पीडिता माहेरून पैसे व दागिणे आणत नसल्याने सासू सास-यांनी तिच्या अंगावरील श्रीधन बळजबरीने काढून घेतले तर पतीने पार्न साईटवरील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. याच काळात पतीचे विवाहबाह्य संबध असल्याची बाब समोर आली मात्र पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकाराचा अधिक तपास उपनिरीक्षक सोनल फडोळ करीत आहेत.