नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखाच्या ऐवज लंपास केला आहे. लॅमरोड भागात झालेल्या या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरट्यांनी चोरुन नले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथील विवेक चंद्रकांत प्रधान यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. प्रधान कुटूंबियांचा लॅमरोड भागातील सौभाग्यनगर येखे साफल्य बंगला आहे. गेल्या बुधवारी (दि.१) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून भावजई आणि आईच्या बेडरूममधील कपाटातून रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख २९ हजार ५४५ रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.