नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जयभवानीरोड भागात घरात घुसून शेजा-याने महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. कुटुंबियास बरबाद करण्याची धमकी देत संशयिताने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्कार, अनुसूचित जाती जमाती अधिनियम (अॅट्रोसिटी) व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असीम शेख (रा.मुस्कान बंगला,जाचकमळा) असे संशयिताचे नाव आहे. अनुसूचित जाती जमातीची विवाहीत पीडिता व संशयित एकाच भागातील रहिवासी असून, गेल्या शनिवारी (दि.११) रात्रीच्या वेळी ती आपल्या घरात एकटी असतांना ही घटना घडली. घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने घरात प्रवेश केला करून महिलेवर बळजबरीने बलात्कार केला. यावेळी त्याने घटनेची वाच्यता केल्यास संपूर्ण कुटुंबियांना बरबाद करून टाकेल अशी धमकी दिल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारी करीत आहेत.