नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे सात लाख रूपये किंमतीचे ऐवज चोरून नेले. हिरावाडीरोडवर ही घरफोडी झाली. या चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे,मोबाईल आणि घरातील एलईडी टीव्ही लंपास केले. या घरफोडीप्रकरणी विलेश देवजी राजदे (५२ रा.प्लॉट नं.१८ महालक्ष्मीनगर,हिरावाडीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल असून पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजदे कुटुंबिय रविवारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. राजदे यांच्या घरास लागून दुकान आहे. सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद दुकानाचे शटर वाकवून घरात प्रवेश केला व घरातील हॉलमधील आणि बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली सोन्याचांदीचे दागिणे ३१ हजार ५०० रूपयांची रोकड घरातील इलईडी टीव्ही, मोबाईल, टॅबलेट आणि सोनी कंपनीचा प्ले स्टेशन असा सुमारे ७ लाख ३८ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.