नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फ्रेन्ड कॉलनी भागात ट्रेंडीग कंपनीचे ऑफिस फोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाख लंपास केले. याप्रकरणी रामहरी शिवराम मुराद (रा.पिंटो कॉलनी,जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. न्याय खाते कर्मचारी सरकारी सोसायटी समोरील एस.आर.ट्रेंडिग कंपनीच्या कार्यालयात ही घटना घडली. रविवारी (दि.२६) रात्री अज्ञात चोरट्यांनी एस.आर.ट्रेंडीग कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून ड्रावर मध्ये ठेवलेली १ लाख ४० हजार रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपा उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.