नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या सहा जणांवर पोलिसांनी कारवाई करत दुचाकी, रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे ६८ हजाराचा ऐवज जप्त केला सिडकोत रूंग्ठा ग्रुपच्या वतीने सुरू असलेल्या बांधकाम साईट भागात उघड्यावर हे सर्व जण जुगार खेळत होते. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत उर्फ राकेश जाधव (रा.हमालवाडी,पेठरोड),रोहित उर्फ रवी गुंजाळ (रा.लक्ष्मननगर,पेठरोड),संतोष नलावडे (रा.तेलंगवाडी,पंचवटी),जोसेफ जाधव (रा.लक्ष्मननगर,तेलंगवाडी),संभाजी मुतकुळे (रा.उंटवाडी) व गजानन पोघे (रा.श्रमिकनगर,सातपूर) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. रनभूमी टर्फ क्रिकेट ग्राऊंड भागात जुगार खेळला जात असल्याचा माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता संशयित पोलिसांच्या जाळ्ळयात अडकले. ते रूंग्ठा ग्रुपच्या वतीने सुरू असलेल्या बांधकाम साईट परिसरात स्व:ताच्या फायद्यासाठी पैसे लावून मटका नावाचा जुगार खेळत व खेळवितांना मिळून आले. या कारवाईत २८ हजाराची रोकड,दोन मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा सुमारे ६८ हजार २० रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई समाधान शिंदे यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलिस नाईक आवारे करीत आहेत.