नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगावाडी भागात वाढदिवसानिमित्त मित्रास शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या तरूणास मद्याच्या नशेत असलेल्या दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. अभिमान सानप व स्वप्निल सावंत (रा.दोघे घनकरलेन,वकिलवाडी) अशी युवकास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणीप्रसाद गजानन बु-हाडे (३० रा.अपहादेव अपा.तेली गल्ली,रविवारपेठ) या युवकाने तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बु-हाडे शनिवारी (दि.२५) गंगावाडी भागात राहणा-या तेजस भागवत या मित्रास वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेला असता ही घटना घडली. सर्व मित्र एकमेकांशी गप्पा मारत असतांना दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी बु-हाडे यास गाठून कुठलेही कारण नसतांना त्यास शिवीगाळ केली. यावेळी उर्वरीत मित्रांनी दोघा संशयितांची समजूत काढून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता एकाने बु-हाडे यास पकडून ठेवत दुस-याने फरशीच्या तुकड्याने त्याच्या तोंडावर हल्ला केला. या घटनेत बुºहाडे जखमी झाला असून अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.