नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोका टॉवर मागे बँकेने सील केलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी तीन महिलांसह एकाविरूध्द मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इकबाल खान व तीन अनोळखी महिला अशी बँकेच्या मिळकतीवर कब्जा करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी धिरेंद्र काशिनाथ दासकुमार (रा.गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. अशोका टॉवर मागील हॅपीहोम कॉलनीतील सना पॅलेस नावाचा बंगला बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सील करण्यात आला आहे. सदर मिळकतधारकाने कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सदर तारण मिळकतीवर बँकेचा ताबा असतांना संशयितासह तीन महिलांनी या बंगल्यावर विनापरवानगी बब्जा केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या बुधवारी (दि.१) बँक पथकाच्या पाहणीत हा प्रकार समोर आला असून संशयितांनी कुलूप तोडून बेकायदा बंगल्यात प्रवेश केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बाळू गिते करीत आहेत.