आत्महत्येचे सत्र सुरुच; शहरात वेगवेगळ्या भागात राहणा-या दोघांनी केल्या आत्महत्या
नाशिक – शहरात वेगवेगळ्या भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केल्या असून दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मुंबईनाका आणि अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिंगाडा तलाव भागात राहणा-या अलका मुनस्वामी नायडू (५५ रा.तिरूपती बालाजी नगर,गिते मळा) यांनी रविवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बिरारी करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील महाजननगर भागात घडली. प्रशांत तुकाराम भोळे (३८ रा.इंद्रप्रस्थ कॉलनी,अतुल डेअरी जवळ) यांनी रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुकाराम भोळे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.
वाहनाची बॅटरी चोरीला
नाशिक : कोनार्क नगर भागात मालवाहू दोन आयशर ट्रक सह एका पिकअप वाहनाची बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. समाधान ज्ञानेश्वर लभडे (रा.कोनार्क नगर,आडगाव शिवार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लभडे यांचे आयशल एमएच ४१ जी ६४१३ व एमएच १२ एआर ३८९ आणि पिकअप एमएच ०६ एजी ७७९ ही तीन वाहने गेल्या शुक्रवारी (दि.१५) रात्री लभडे मळय़ातील मापामेश्वर वायर व बळीराज वाटर सप्लायर्स आवारात पार्क केलेली असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी आवारातील तार कंपाऊडमधून प्रवेश करीत तीन्ही वाहनांच्या सुमारे १४ हजार रूपये किमतीच्या तीन बॅट-या चोरून नेल्या. अधिक तपास पोलिस नाईक कंदिलकर करीत आहेत.