नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे ३७ हजार रूपयांच्या ऐवज लंपास केला. लहवित मार्केट भागात झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरुन नेले. ही घरफोडी एका महिलेसह तिच्या साथीदाराने केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल प्रकाश इर्षे (रा.अजगरअळी चाळ,लहवित मार्केटजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. इर्षे कुटूंबिय सोमवारी (दि.८)कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील दागिण्यांसह रोकड चोरून नेली.
या घटनेत ३७ हजाराच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला असून ही घरफोडी सुमित्रा सुरज तोमर (रा.देवळाली गाव) व तिच्या पुरूष साथीदाराने केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.