नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवरील मार्केट यार्ड समोरील भाजीपाला बाजारात भाजीपाला खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या पर्स मधील रोकडसह सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी तनुजा विशाल पाटील (रा.डोंबिवली, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटील या गेल्या १९ मे रोजी शहरात आल्या होत्या. परतीच्या प्रवासापूर्वी त्या दिंडोरीरोडवरील मार्केट यार्ड भागात भाजीपाला खरेदीसाठी गेल्या असता ही घटना घडली. रस्त्यावरील विक्रेत्याकडून त्या भाजीपाला खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधून त्यांच्या गळया्तील पर्सची चैन उघडून पर्स मधील रोकड व मंगळसुत्र असा सुमारे २४ हजार ७०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.