नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिग्नस हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे दीड लाख रूपये किमतीची मालवाहू पिकअप चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश हिरामण रणमाळे (रा.बग्गा अपा.जॉगिंग ट्रॅक जवळ,सुचितानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रणमाळे यांचा सुमारे दीड लाख रूपये किमतीची मालवाहू पिकअप रविवारी (दि.२८) रात्री सिग्नस हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
स्कुटीच्या डिक्कीतील मोबाईल लांबवला
गोल्फ क्लब मैदान परिसरात पार्क केलेल्या स्कुटीच्या डिक्कीतील मोबाईल भामट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश कुमार (४३ रा.तपस्वी हॉटेल जवळ,मुंबई आग्रा महामार्ग) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कमलेश कुमार सोमवारी (दि.२९) शतपावली करण्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर गेले होते. उत्तरेकडील गेटवर पार्क केलेल्या त्यांच्या स्कुटीची डिक्की उघडून चोरट्यांंनी सुमारे २५ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक काकुळते करीत आहेत.