नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालक कामानिमित्त दुकानाबाहेर पडले असता दोघा नोकरांनी गल्यातील ७० हजाराची रोकड लंपास केली. याप्रकरणी श्रीपाद सुभाष भुतडा (४२ रा. मालेगाव स्टॅण्ड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजेंद्र रावत आणि जोगेंद्र रावत अशी भामट्या नोकरांची नावे आहेत. भुतडा यांचे पंचवटी कारंजा भागात श्रीनिवास वस्तू भांडार नावाचे दुकान असून, दोघे संशयित या दुकानातील नोकर आहेत. गेल्या मंगळवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास भुतडा कामानिमित्त दुकानाबाहेर पडले असता ही घटना घडली.
मालक दुकानाबाहेर गेल्याची संधी साधत दोघा भामट्यांनी दुकानातील गल्ला उघडून त्यातील ७० हजार रूपयांची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.