नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील गणेश चौकात भरदिवसा उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाख रूपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस भामट्या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
विद्या श्रेणीक सुराणा (रा.प्रेमझुक बंगला, स्वामी समर्थ केंद्राजवळ, गणेशचौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सुराणा या गेल्या रविवारी (दि.१४) अल्पशा कामानिमित्त शेजारी गेल्या असता ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात शिरून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ७२ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1659862595199959040?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1659862526191075329?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1659862489704824832?s=20